जामनेर (प्रतिनिधी): – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गिरीश महाजन यांनी हजारो जनसमुदायाच्या साक्षीने तब्बल ७ व्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन असणाऱ्या जामनेर विधानसभा मतदार संघात सलग सहा वेळा विजय मिळवणाऱ्या माजी ग्रामविकासमंत्री तथा पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी हजारो जनसमुदायाच्या साक्षीने मोठे शक्तिप्रदर्शन करीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयापासून माजी मंत्री गिरीश महाजन हे खुल्या वाहनावर स्वार होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात येताना बँड पथकाच्या ठेक्यावर ताल धरत हजारो तरुणांचा जनसागर गिरीश महाजन यांच्या विजयी संकल्पाची कास धरून महाजन यांना सातव्यांदा जामनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन करतांना दिसून येत होते.राजमाता जिजाऊ चौकातील जाणता राजा स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भुसावळ चौफुली येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याला गिरीश महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जनसमुदायाला संबोधीत करतांना महाजन म्हणाले यापुढे प्रत्येक कार्यकर्ता आमदार म्हणून माझ्या विजयाची जबाबदारी घेईल माझ्यावर ईतर मतदार संघाची जबाबदारी असल्याने माझ्या प्रचाराची धुरा सर्व कार्यकर्त्यांनी सांबाळायची असून आपला विजय गेल्या सहा टर्म मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा रेकॉर्ड ब्रेक मतांनी होणार असल्याचे भाकीत त्यांनी यावेळी केले. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खा. तथा केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे, जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान खा.स्मिता वाघ, माजी आमदार राजु मामा भोळे, माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जितेन्द्र पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीस्कर, संजय दादा गरूड, प्रा.शरद पाटील, डॉ . प्रशांत भोंडे, सुहास पाटील, उल्हास पाटील,रविंद्र झालटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग कोळी, नवल पाटील ,अतिश झालटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजमाता जिजाऊ चौकातील जाणता राजा स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भुसावळ चौफुली येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याला गिरीश महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जनसमुदायाला संबोधीत करतांना महाजन म्हणाले यापुढे प्रत्येक कार्यकर्ता आमदार म्हणून माझ्या विजयाची जबाबदारी घेईल माझ्यावर ईतर मतदार संघाची जबाबदारी असल्याने माझ्या प्रचाराची धुरा सर्व कार्यकर्त्यांनी सांबाळायची असून आपला विजय गेल्या सहा टर्म मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा रेकॉर्ड ब्रेक मतांनी होणार असल्याचे भाकीत त्यांनी यावेळी केले. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खा. तथा केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे, जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान खा. स्मिता वाघ, माजी आमदार राजु मामा भोळे, माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जितेन्द्र पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीस्कर, संजय दादा गरूड, प्रा.शरद पाटील, रविंद्र झालटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग कोळी, अतिश झालटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours