जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील रोटवद नगरीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी संतांच्या कृपार्शिवादाने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, महीला भजनी मंडळ, ग्रामस्थ देवस्थान मंडळ, कला भजनी मंडळू व देवस्थान ट्रस्टी यांच्या वतीने दी.२६ पासून श्री संगीत रामायण व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे मोठ्या थाटात प्रारंभ होत आहे.
श्री संगीत रामायण प्रवक्ते – ह.भ.प. विशाल महाराज चितोड यांच्या मधूर वाणीतून भक्तांना श्री संगीत रामायण कथा ऐकण्याचा योग जुळून आला आहे.तसेच आठवडाभर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाची आणी रामायण कथेच्या पर्वणीचा आनंद रोटवदकरांना यावेळी मिळणार आहे.
दररोज रात्री ८:३० ते १०:३० कीर्तनसेवा होणार असून त्यात दि.२६ (गुरुवार) रोजी ह.भ.प.विशाल महाराज चितोड यांच्या कीर्तन सेवेने प्रारंभ होणार असून दि. २७ (शुक्रवार) रोजी ह.भ.प. उमेशजी महाराज चिंचोली ,२८ (शनिवार) ह.भ.प. मुकुंद महाराज पहूर, दि.२९ (रविवार) ह.भ.प प्रणव महाराज दाभाडी,दि. ३० (सोमवार) ह.भ.प.विशाल चिलगाव ,३१ (मंगळवार) ह.भ.प.अविनाश महाराज नाचणखेडा, १ एप्रिल (बुधवार) ह.भ.प.आदेश महाराज सातगाव, तसेच दि. २ एप्रील (गुरुवार) रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प.गजान महाराज पारोळा यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे तसेच ह.भ.प विशाल महाराज चितोड यांच्या मधूर स्वरातून दररोज स.९ ते ११ व दुपारी २ ते ५ या वेळेत रामायण कथेचे रसाळ निरुपणाचे आयोजन असणार आहे.तर सकाळी ५ वाजता काकड आरती सायंकाळी ६ वाजता हरीपाठाचे आयोजन असणार आहे.
जागृत स्वयंभू नवसाला पावणारा मारुती अशी श्रद्धा आणि ओळख असलेले रोटवदला हनुमान जयंती या दिवशी सर्व भाविक भक्तांनी हनुमंत रायांचे दर्शन आणि कृपाशीर्वाद घेऊन काल्याचे कीर्तनाचे श्रवण करून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे ग्रामस्थ देवस्थान समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे .

+ There are no comments
Add yours