जामनेरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.
जामनेर (पंढरीनाथ पाटील):- येथील राजमाता जिजाऊ चौकात संभाजी ब्रिगेड व समाज बांधवांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तर जिनियस इंटरनॅशनल स्कूल ने सजीव देखाव्यासह विविध कलाविष्कार सादर करून साजरी केली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती.
राजमाता जिजाऊ माँसाहेब हे स्त्रीशक्तीचे मूर्तीमंत प्रतीक आहेत. त्यांनी धैर्याने, दूरदृष्टीने आणि निर्णयक्षमतेतून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले ज्यांनी न्यायनिष्ठ व लोकनिष्ठ असणाऱ्या रयतेच्या राज्याची निर्मिती केली. स्त्रीशक्तीच्या संस्कार आणि नेतृत्वातून न्यायी शासक आणि सुशासित राज्य घडवता येते, ही प्रेरणा देणाऱ्या स्वराज्याचे स्फूर्तीस्थान राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या जिनियस इंटरनॅशनल स्कूल मधून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात व विविध कलाविष्कार सादर करत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिवंत देखाव्यासह मिरवणूक काढत राजमाता जिजाऊ चौकातील शिवसृष्टी मध्ये जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस राजकीय , सामाजिक मान्यवर आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी आपले विविध कलाविष्कार सादर करून अभिवादन केले. यात ढोल, लेझीम, काठी फिरवणे तसेच घोड्यावरील कसरती या सारख्या अनेक कलाविष्कारांचे सादरीकरण केल्यामुळे जिजाऊंच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने उजाळा मिळाल्याच्या भावना शहर वाशियांनी यावेळी बोलून दाखवल्या. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक व संस्थेचे संचालक मंडळ,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांच्यासह समाज बांधव व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours