*जामनेर तालुक्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाला सुरुवात.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

महिला व बालविकास, आरोग्य, पोषण, महसूल, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध योजनांचा समावेश.

जामनेर (प्रतिनिधी):- दि. १७ रोजी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तालुक्यातील पहूर पेठ ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.

या ग्रामसभेत त्यांनी सेवा पंधरवडा तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी ग्रामसभेतून नागरिकांना सेवा पंधरवड्यातील कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये महिला व बालविकास, आरोग्य, पोषण, महसूल, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांच्या योजनांचा समावेश होता.

यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, विभागीय अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसभेतूनच सेवा पंधरवड्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रशासन व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे  तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या सेवा व योजना अधिक प्रभावीपणे मिळत राहतील असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours