जामनेर – लोकशाही माझे मंदिर आहे. सारे मतदार आम्ही बांधव आहोत. माझ्या लोकशाहीवर आणि संविधानावर माझे प्रेम आहे.
माझी लोकशाही व माझे मतदार बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. भारतीय लोकशाहीचे व मतदारांचे आणि त्यांची समृद्धी यातच माझे हित आणि सौख्य सामावले आहे.


मी, माझ्या मतदानाचा, मतदारांचा आणि मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेचा मान ठेवीन आणि मतदान करण्यासाठी सौजन्याने वागेन.
माझ्या लोकशाहीतील दर्जेदार मतदान प्रक्रियांचा मला अभिमान आहे. पारदर्शक मतदान करून आदर्शपिढी निर्माण करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव मतदान करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
+ There are no comments
Add yours