जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील माळपिंपरी येथे डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील चतुर्थी वर्षातील विद्यार्थी (रावे रब्बी ) २०२५ – २६ यांनी प्राचार्य डॉ.शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी .एम . गोनशेटवाड ,कार्यक्रमाधिकारी प्रा. व्ही. एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमात कृषीदूत सुशांत जाधव, पवन बुवा , सौरभ पाटील , संग्राम पवार आणि प्रवीण बोप्पुडी तसेच येथील सरपंच सौ.सुनिताताई ज्ञानेश्वर पटील,उपसरपंच सौ.मायाताई देवानन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी गावातून देशभक्तीपर रॅली काढून नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम तसेच भारतीय संविधानाबाबत जनजागृती केली.
रॅलीदरम्यान “वंदे मातरम” , “संविधान आमचा अभिमान”, “प्रजासत्ताक दिनाचा विजय असो”, “भारत माता की जय” अशा घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा फडकावत देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या रॅलीला ग्रामस्थ, युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

+ There are no comments
Add yours