इंदिराबाई ललवाणी विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
जामनेर(प्रतिनिधी ):- येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष विनीत महाजन, सचिव किशोर महाजन, सर्व संचालक मंडळाचे सदस्य,मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य डी.झेड.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संविधान वाचन, साक्षरता वाचन तसेच व्यसनमुक्तीची शपथ क्रीडा शिक्षक बी.पी.बेनाडे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
देशभक्ती गीताच्या तालावर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत तर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी डबेल्स कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील,जी.डी. कचरे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक समीर घोडेस्वार यांनी विशेष परिश्रम घेतले.
ध्वजारोहण प्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours