*द्वार भेटीने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे कार्यकर्त्यांनी केले आवाहन.*

शहरातील जानकार मतदात्यांनी दिले मतदानाची टक्केवारी घटण्याचे संकेत.

जामनेर (पंढरीनाथ पाटील): – येथील नगर परिषदेत साठी २ डिसेंबर रोजी मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दि.१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेऊन आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी आग्रह करतांना दिसून आले.
येथील १७ नगरसेवक पदांसाठी ४३ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असुन प्रत्येक मतदान केंद्रावर ६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.सर्व कर्मचारी ईव्हीएम व साहित्यांसह केंद्रांवर पोहचले असून मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यात पोलीस राखीव दलाची एक तुकडी व महीला पोलिसांचा समावेश करण्यात आला असल्याने मतदारांना निर्भयपणे व शांततेत मतदान करण्याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी विनय गोसावी व सहायक अधिकारी नितीन बागुल यांनी केले आहे. येथील निवडणुकीत १७ उमेदवार निवडून द्यावयाचे असून यासाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदी सौ.साधनाताई महाजन या अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असल्याने होणारी निवडणूक ही १७ नगरसेवक पदासाठी होत असून नगराध्यक्षांसह प्रभाग क्रमांक २,११, १३ या ३ प्रभागात दोघंही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने येथे बूथ सुद्धा लागणार नाहीत त्यामुळे या प्रभागातील कार्यकर्ते हे इतर प्रभागात जाऊन प्रचार करतांना दिसून येत आहेत. तसेच होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता शहरातील जानकर मतदारांकडून व्यक्त केली जात असल्याने टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले प्रयत्न तोकडे ठरतील का? हे पाहणे औचित्याचे ठरेल.या निवडणुकीत काही प्रभागात चुरशीच्या लढती होतील असे एकंदरीत चित्र जामनेरात दिसून येत आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours