*अखेर प्रतीक्षा संपली उद्या १७ नगरसेवक पदांसाठी मतमोजणी.*

पोलिसांचा चोख बंदोबस्त ,५८ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी.

जामनेर (अमोल महाजन):- येथील नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. जवळपास १९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर उद्या २१ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. अगोदरच नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे बिनविरोध निवडून आलेले आहेत.उरलेल्या १७ जागांसाठी मतमोजणी होत असून यासाठी १० टेबलांवर मतमोजणी होणार असून एक टेबल टपाली मतमोजणी साठी ठेवण्यात आला असून प्रत्येक टेबलांवर ४ कर्मचारी कामकाज बघणार आहेत. सोबत २ इंजिनियर असून त्यांच्या हाताखाली पेट्यांची ने आन करण्यासाठी १० कर्मचारी कामकाज बघणार आहेत. यासाठी जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. १७ जागांसाठी उद्या रविवार रोजी मतमोजणी होणार असल्याने या जागांवर कोणत्या पक्षांचे उमेदवार विजयी होतात याबाबत शहरवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात कमालीची उत्सुकता दिसत आहे . गतवेळच्या सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यानुसार आमचेच सर्वच्या सर्व म्हणजे १७ अधिक १० म्हणजेच २७/० उमेदवार विजयी होतील तर महाविकास आघाडीच्या वतीने निकालात आम्ही चमत्कार घडवुन दाखवुन देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
यंदाची पंचवार्षीक निवडणुक नगराध्यक्ष पदच बिनविरोध शिवाय भाजपच्या नऊ जागाही बिनविरोध झाल्याने सुरुवातीला प्रचारात रंगत काहिशी कमी दिसुन येत होती. पण जस जसे मतदान जवळ येत गेले आघाडी आणि भाजपने चांगलीच चुरस निर्माण केली होती.जळगांव रस्त्यावरील शासकीय आय टी आय ईमारती मध्ये रवीवार २१ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रत्येकी पाच फेऱ्यांमध्ये मत मोजणी पार पडुन दुपारी १२ वाजे पर्यंत सर्व निकाल हाती येतील असे अपेक्षीत आहे .

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours