जामनेर(प्रतिनिधि):- येथील विधानसभा मतदारसंघात २६ उमेदवारांकडून ३४ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यात काही उमेदवारांनी डबल अर्ज खरेदी केले होते. आज अर्ज छाननी अंती २६ पैकी २२ उमेदवार रिंगणात असून ४ नोव्हे. पर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे.४ उमेदवारां पैकी डॉ .प्रशांत भिमराव पाटील यांनी भरलेल्या दोन अर्जां पैकी एक नाव ए. बी. फॉर्म दिलीप खोडपे यांच्या अर्जाला लागल्यामुळे यादीमधून कमी झाले आहे तसेच डी के पाटील यांचे सुद्धा नाव ए बी फॉर्म खोडपे सरांच्या अर्जाला लागल्यामुळे यादीमध्ये समाविष्ट नाही. तर दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज कागदपत्र अपूर्ण असल्या कारणाने बाद झाले आहेत. त्यामुळे आता २२ उमेदवार रिंगणात आहेत.४ तारखेला उमेदवारी माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्याच दिवशी किती अपक्ष उमेदवार माघार घेतात आणि कीती उमेदवार निवडणूक लढवतात हे स्पष्ट होणार आहे. वैध अर्जं ठरलेले उमेदवार असे,१) खोडपे दिलीप बळीराम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार)२).गिरीश दत्तात्रय महाजन(भारतीय जनता पार्टी) ३) विशाल हरिभाऊ मोरे बुलढाणा (बहुजन समाज पार्टी) ४)अण्णासाहेब रामचंद्र राठोड(हिंदु समाज पार्टी) ५)प्रभाकर पंढरी साळवे(राष्ट्रीय समाज पक्ष) ६)मदन शंकर चव्हाण(भारतीय जन सम्राट पार्टी) तर इतर सर्व अपक्ष उमेदवार आहेत.) अनिल रंगनाथ पाटील, आत्माराम सुरसिंग जाधव, चव्हाण ज्ञानेस्वर गोपीचंद, जितेन्द्र पांडुरंग पाटील, जितेन्द्र श्रावण पाटील, दिपकसिंह शांतीलाल राजपूत, दिलीप मोतीराम खामंकर, दिलीप शांताराम खोडके, नितीन स्वरुपचंद नाईक, परवेझ आलम अब्दुल रशीद शेख, पूना पुंडलीक शेजुळे, प्रशांत भीमराव पाटील, मोहम्मद समीर युनूस खान, राजेन्द्र सुभाष खरे, राहूल राय अशोक मुळे, हुसेन युसुप तडवी आदी अपक्ष उमेदवार आहेत त्यात भराडी ता. जामनेर येथील एक अपक्ष उमेदवार दिलीप शांताराम खोडके हे नाव मतदारांना कन्फ्युज करण्यासाठी घेण्यात आल्याने मतदार संघात एकच चर्चा दिसून येत आहे.




+ There are no comments
Add yours