*जामनेर नगर परिषदेत निर्विवाद वर्चस्व (फरक २३/४)*

भाजप नगराध्यक्षांसह २२ तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ४ नगरसेवक विजयी.

जामनेर (प्रतिनिधी):- येथील नगर परिषदेच्या १७ नगरसेवक पदांसाठी मतदान घेण्यात आले होते. आधीच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साधनाताई महाजन यांच्यासह ९ नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले होते. त्यामुळे २ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १७ नगरसेवक निवडून द्यावयाचे होते. त्या १७ उमेदवारांसाठी दी.२१ रोजी येथील जळगांव रोडवरील शासकीय आय टी आय मध्ये मतमोजणी घेण्यात आली. यावेळी भाजपाला २७/० जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचा अपेक्षा भंग झाला असून जामनेर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंचू प्रवेश करत ४ नगरसेवक निवडून आणले आहेत. निवडणूक निकाल लागताच सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आय टी आय पासून ते नगर परिषद व ना.गिरीश महाजन यांच्या घरा पर्यंत विजयी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

@भाजप विजयी उमेदवार – प्रभाग १ अ मधून दत्तू नामदेव जोहरे (१२९७ मते), प्रभाग ३ अ मधून बाबुराव उखडू हिवराळे (१०८२ मते) आणि प्रभाग ३ ब मधून माधुरी गजानन कचरे (१३५१ मते) विजयी झाले आहेत. वेणूबाई रमेश माळी (प्रभाग ५ ब) – ११९९ मते,मुन्नी हारुन पिंजारी (प्रभाग ६ अ) – २०६९ मते,बेगम सईदा बी युनुस खान (प्रभाग ६ ब) – १७३३ मते, तेजस संजय पाटील (प्रभाग ८ अ)- १५२३ मते,शितल गोकुळ माळी (प्रभाग ८ ब) – १३२७ मते,आतिष छगन झाल्टे (प्रभाग ९ अ) – १८१९ मते,प्रतिभा जितेश (पप्पू) पाटील (प्रभाग ९ ब) -१७९६ मते, सुहास बाबुराव पाटील (प्रभाग १२ अ) – १६५७,नीलिमा राहुल पाटील (प्रभाग १२ ब) – १५३९ मते.

@ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची कामगिरी भाजपच्या लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाने काही जागांवर आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. * राष्ट्रवादी विजयी उमेदवार – प्रभाग ४ अ मध्ये जावेद इकबाल अब्दुल रशीद यांनी १६३९ मते मिळवून विजय मिळवला.प्रभाग ४ ब मध्ये सालेहा अंजुम इरफान शाह १४३० मते, प्रभाग ७ अ मध्ये बतुल बी शेख हुसेन कुरेशी १६२२ मते आणि प्रभाग ७ ब मध्ये परविन बानो शेख नाजीम १६७० मते या उमेदवारांनी तुतारीचा झेंडा फडकवला आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज २१ रोजी हे अधिकृत निकाल जाहीर केले आहेत.
या निकालावरून जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम राहिली असून, विरोधकांना केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
@सौ.साधनाताई महाजन ह्या नगराध्यक्ष पदासाठी आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.बिनविरोध निवडून आलेले भाजपचे नगरसेवक – प्रभाग ११ब तायडे उज्वला दीपक, २ ब झाल्टे कल्पना रवींद्र, प्रभाग १३ब शेवाळे किलुबाई जिमल्या ५अ पाटील संध्या जितेंद्र १३अ बावीस्कर महेंद्र कृपाराम, २अ महाजन श्रीराम वामन, ११अ भोंडे प्रशांत भागवत २ब पवार पूजा सुभाष, १०ब सुरवाडे उज्वला मुकुंदा,

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours