तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती ठरल्या सरस.
अध्यक्ष, सचिव,मुख्याध्यापक, पालक वर्गाने केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
अध्यक्ष, सचिव,मुख्याध्यापक, पालक वर्गाने केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
जामनेर (प्रतिनिधी):- २७ रोजी येथील जीनियस इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनीत प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही विभागात ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूल मधिल विद्यार्थ्यांचे प्रदर्शन सरस ठरल्याचे दिसून आले. विभागातील १२० मॉडेल्स पैकी जिकरा शाळेतील विद्यार्थी सामी आसिफ देशमुख इयत्ता आठवी याने प्राथमिक विभागात तिसरा क्रमांक पटकावला.तसेच कैस जाकिर खान या विद्यार्थ्यांने सुद्धा माध्यमिक विभागात तिसरा क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत निवड झाल्याबद्दल व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक शेख शादाब अहमद , विज्ञान शिक्षक नदीम व इतर शाळेतील शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले.या विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान असल्याच्या भावना अध्यक्ष यांनी व्यक्त केल्या.

+ There are no comments
Add yours