पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्युज
जामनेर – (पंढरीनाथ पाटील):- येथील नगर परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असल्याने एका जागेसाठी निवडणूक होऊ घातली असून आज दि.२३ रोजी गिरीजा कॉलनी भागातील संतोषी माता मंदिरात नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते ॲड. शिवाजी नाना सोनार, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी गटनेते तथा प्रभाग क्रमांक ११ मधील बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक डॉ.प्रशांत भोंडे , ना. महाजन यांचे स्वीय्य सहाय्यक तथा नगरसेवक पती दीपक तायडे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, निलेश चव्हाण सर, शहर सरचिटणीस प्रल्हाद सोनवणे, आणि सर्वांच्या नजरा ज्यांच्याकडे लागून राहील्या होत्या ते जामनेर एज्युकेशन चे सुरेश धारीवाल , प्रभाग क्रमांक १३ मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक नाना बावीस्कर,उमेदवार पती सुनील पाटील, याच प्रभागातून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक मुकुंदा सुरवाडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक , नगरसेविका व निवडणुकीला सामोरे जाणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते गिरीजा कॉलनी भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून गिरीजा कॉलनी परिसरात प्रचार रॅली काढून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

+ There are no comments
Add yours