दुसऱ्याच दिवशी खोडपे यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद.
जामनेर (प्रतिनिधी):- उमेदवारी अर्ज माघारी च्या दिवशी नगर परिषदेतच कॉलर ड्रामा घडला होता.त्या आशयाची क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती. त्यात अर्ज माघारी घेणारे उमेदवार ॲड.राजू मोगरे यांचा अर्ज त्यांची कॉलर पकडून माघारी घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. व क्लिप मध्ये भाजपची दादागिरी व दडपशाही म्हणून उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत ॲड. राजू मोगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे सर, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, गौरव खोडपे, किरण राजमल पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आज दि.२३ रोजी दिलीप खोडपे यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गौरव खोडपे यांनी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेले सर्व आरोप खोडून काढत पुराव्यानिशी खंडण केले आहे. त्यात भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर असल्याचे पुरावे त्यांनी नावे व फोटोंसह सादर केले असून त्यात भाजपचे काही पदाधिकारी , कार्यकर्ते, एक जिल्हा परिषद सदस्य, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांचे नावे समोर आणले आहेत. आणि विशेष म्हणजे कॉलर ड्रामा क्लिप व्हायरल झाल्यानंतर २४ तास उलटल्यावर ॲड. मोगरे यांनी पत्रकार परिषद घेतली असल्याचे खोडपे यांनी सांगितले असून इतका वेळ उलटल्यावर त्यांना पत्रकार परिषद का? घ्यावीशी वाटली हा प्रश्न उपस्थीत केला आहे. त्याचे कारण गौरव खोडपे यांनीच स्पष्ट केले असून त्यात त्यांनी सांगितले आहे की, त्यांनी आपल्या उमेदवारीची सेटलमेंट केलेली असून कोणत्यातरी अदृश्य शक्तीमुळे त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्यात त्यांचे कोणते हित साध्य झाले असेल हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहीत असेल. एकाच वेळी दोन दोन वॉर्डातून माघार होत असेल तर! त्याचा अर्थ जामनेरकर जनतेला चांगलाच माहीत आहे. त्यामुळे ते आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत असेल तर, आम्ही सुद्धा त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू असे शेवटी खोडपे यांनी सांगितले आहे.

+ There are no comments
Add yours