*ज्ञानगंगा विद्यालयात प्रवेशोत्सव व पुस्तके वितरण उत्साहात संपन्न.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

ज्ञानगंगा विद्यालयात प्रवेशोत्सव व पुस्तके वितरण उत्साहात संपन्न

जामनेर (प्रतिनिधी):- दी.१६ रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू होत असून जामनेर तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात  संपन्न झाला. येथील न्यू इंग्लिश स्कूल, इंदिराबाई ललवाणी, ज्ञानगंगा माध्यमिक या नावलौकिक असलेल्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनचे स्वागत करण्यात आले.
ज्ञानगंगा विद्यालयात संस्थेचे ज्येष्ठ संचालक अँड.शिवाजी नाना सोनार , जामनेर नगरपालिकेचे माजी गटनेता डॉक्टर प्रशांत भोंडे, प्रा.राजेंद्र सोनवणे व देवीदास काळे ,किशोर पाटील यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन  योगेश बावस्कर यांनी केले.
याप्रसंगी सर्व उपस्थीत विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्याना समग्रशिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश व पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी स्वच्छता,आरोग्य व शिस्त याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

इ.५वी ते ८वी च्या मुलांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर पहिल्याच दिवशी गजबजून व आनंदून गेला होता. संस्थेचे अध्यक्ष ना. गिरीश महाजन(जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य),सचिव सौ साधनाताई महाजन (मा.नगराध्यक्षा नगरपरिषद जामनेर) व ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड.शिवाजी नाना सोनार व सर्व संचालक मंडळाने नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी परिश्रम घेतले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours