चार खेळाडूंना विभागीय स्पर्धेत ठसा उमटवण्याचीमिळाली संधी.
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पाचोरा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एम. एम. कॉलेज, पाचोरा येथे जिल्हास्तरीय उर्वरित शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दि.१९ ऑक्टो.रोजी उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९ वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर निवड मिळवून शाळेचा झेंडा उंचावला.
विभागीय स्तरासाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी :
१९ वर्षाखालील मुले :- ११० मी. अडथळा शर्यत — द्वितीय क्रमांक :- सोहम विलास जाधव (इ. १२ वी विज्ञान)
थाळी फेक – द्वितीय क्रमांक :- प्रेम राजू बोदडे (इ. १२ वी विज्ञान)
१९ वर्षाखालील मुली :- १०० मी. धावणे — द्वितीय क्रमांक : जयश्री रामचंद्र घोंगडे (इ. १२ वी विज्ञान)
तिहेरी उडी – द्वितीय क्रमांक : कोमल राजू शिंदे (इ. १२ वी विज्ञान)
या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस. एन. चवरे, उपप्राचार्य प्रा. डी. झेड. गायकवाड यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

+ There are no comments
Add yours