जालना जिल्ह्यातील शिपोरा अंभोरा येथे करण्यात आले होते स्पर्धेचे आयोजन.
जामनेर (अमोल महाजन):- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ ते१५ डिसेंबर या दरम्यान घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुले-मुली राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय, शिपोरा अंभोरा (ता.जाफ्राबाद, जि. जालना) येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेरच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकाविले.बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीशिवछत्रपती पुरस्कार्थी तथा महाराष्ट्र राज्य डॉजबॉल संघटनेचे सचिव डॉ.हनुमंत लुंगे, ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थाध्यक्ष सुरेशजी दिवटे, जालना जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा अधिकारी लता लोंढे, क्रीडा अधिकारी आशिष जोगदंड, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम आदी.मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडूंना सिल्वर मेडल व ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
१९ वर्षांखालील उपविजयी संघातील खेळाडू :संघ कर्णधार सोहम विलास जाधव (१२ वी), तेजस नितीन राऊत (१२ वी), रामेश्वर गजेंद्र परिहार (१२ वी), पंकज प्रवीण गव्हांडे (१२ वी), सचिन प्रकाश गव्हांडे (१२ वी), योगेश विठ्ठल पवार (१२ वी), भावेश मनोज जैन (१२ वी), तन्मय उदयसिंग राजपूत (११ वी), आर्यन चरणसिंग राजपूत (११ वी), सुजित समाधान पाटील (११ वी).
या उल्लेखनीय यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.डी.झेड. गायकवाड, पर्यवेक्षक प्रा.जी. जी.अत्तरदे, पर्यवेक्षक प्रा.व्ही.बी.पाटील, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.याशिवाय महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव व सचिव योगेश सोनवणे यांनीही संघाचे कौतुक केले.संघाला क्रीडा विभाग प्रमुख जी. सी. पाटील, बी. पी. बेनाडे, जी. डी. कचरे, सौ. कीर्ती पाटील, प्रा. समीर घोडेस्वार तसेच आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू विनायक सपकाळे व राष्ट्रीय खेळाडू मयूर चांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

+ There are no comments
Add yours