माळपिंप्रीला कृषीदुतांचे आगमन, ‘ रावे ‘ अंतर्गत १० आठवडे उपक्रम.
जामनेर (अमोल महाजन):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे ) रब्बी २०२५-२६ अंतर्गत अंतिम वर्षाचे विद्यार्थी माळपिंप्री येथे दाखल झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.एम.गोणशेटवाड ,कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही.एस.पाटील व संबंधित विषयातील विषय विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत प्रवीण बोपूडी , पवन बुवा , सुशांत जाधव, सौरभ पाटील आणि संग्राम पवार .या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पुढील १० आठवडे गावातच राहून माळपिंप्री येथील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांद्वारे आणि प्रात्यक्षिकांच्यासहाय्याने माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शेन करतांना दिसून येत आहेत.यात जमिनीचे प्रकार, माती व पाणी परीक्षण, काटेकोर पाणी व्यवस्थापन, विविध पिकांची लागवड, हायटेक फार्मिंग, लागवड ते काढणी पर्यंतचे तंत्रज्ञान, आंतरपीक -सापळा पीक, पिकांवर येणारे कीड व रोग, मित्र किडी व शत्रू किडिंची ओळख, आर्थिक नुकसानीची पातळी कशी ओळखावी यांची माहिती एव्हढेच नाही तर घरच्या घरीच अल्पखर्चात जीवामृत, दशपर्णी, गांडूळ खत कसे तयार करायचे याबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. माळपिंप्रीच्या सरपंच सौ.सुनीता ज्ञानेश्वर पाटील व ग्राम पंचायत सदस्य यांनी कृषी दूतांचे स्वागत केले. यावेळी गावातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours