*आज उमेदवरांनी मतदासंघांत द्वार टू द्वार प्रचारावर भर दिला. तर निवडणुकीसाठी यंत्रणा झाली सज्ज.*

 

जामनेर (प्रतिनिधी):- दी.२० रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आज दी.१९ हा मूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रमूख उमेदवारांनी काय केले याचा थोडक्यात आढावा.

निवडणूक जाहीर झाल्यापासून जामनेर मतदार संघात महायुतीचे उमेदवार माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्यात चुरस बघायला मिळाली.

दी.१९ रोजी परस्पर विरोधी उमेदवारांकडून द्वार टू द्वार प्रचार करण्यात आला असून मतदारांच्या गाठी भेटी वर सर्वच उमेदवारांनी जोर दिल्याचे एकंदरीत चित्र दिसून आले.

महाविकास आघाडीच्या वतीने दिलीप खोडपे सरांसाठी साठी निवडणूक जाहीर झाल्या पासून शरद पवार साहेब , रोहीत पवार , खा.अमोल कोल्हे, आ.एकनाथ खडसे(नाथाभाऊ), पारस ललवाणी यांच्या झंझावाती प्रचार सभा झाल्या. तर महायुतीचे उमेदवार गिरीश भाऊ यांच्यासाठी कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा येथे झाली नाही. गिरीश भाऊ महाजन हेच स्टार प्रचारक असल्याने त्यांना ईतर उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ द्यावा लागल्याने त्यांच्या वतीने मतदार संघात त्यांच्या सौभाग्यवती साधनाताई महाजन यांनी कार्यकर्ते सोबत घेत तालुक्यात जोरदार प्रचार करुन गिरीश महाजन यांचे विकासाचे व्हिजन मतदारांना समजून सांगीतले असून आज सुद्धा त्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. त्या शिवाय उद्या २० रोजी होणाऱ्या निवडणुकीची पूर्व तयारी जसे, मतदार याद्या, पुलींग एजंट नेमणे, बूथ वाईज याद्या वाटप करुन बूथ उभे करण्या बाबत आढावा घेऊन सूचना देणे ,मतदारांना मतदान करण्यासाठी उमेदवारांचे चिन्ह नसलेल्या पावत्या काढून देणे या बाबत सर्वच उमेदवारांनी आढावा घेतल्याचे दिसून आले. 

जामनेर विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज.

  विधानसभा मतदारसंघात आज होणाऱ्या निवडणुकीत ३४३ मतदान केंद्रासाठी ३७१ कर्मचारी पथक नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक पथकात ५ कर्मचारी असतील तसेच पोलीस आशा सेविका अंगणवाडी सेविका वगळून. 

७६ कर्मचारी अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.

तर निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ३९६ कर्मचारी,२६८ होमगार्ड ,तीन डी वाय एस पी 

दोन पी आय २४ ए पी आय आणि पी एस आय तसेच

९० गार्ड असा पोलीस फाटा तैनात असणार आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours