पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
मुलींनी पराठे सोबत कराटे शिकले पाहिजे.
जामनेर( प्रतिनिधी):- हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून आपल्या संस्कृतीमध्ये नारी पूजनाला विशेष महत्त्व दिले गेले म्हणून नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीपूजन करून आपण अष्टमीला विशेष करून कन्या पूजनाचा कार्यक्रम करतो जे देवी स्वरूप असतात. म्हणून मुलींनी आता पराठे सोबत कराटे पण शिकले पाहिजे आणि बाटी सोबत लाठी पण शिकली पाहिजे असे श्री शाम चैतन्यजी महाराज यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या दुर्गोत्सवानिमित्त रविवार दि.१२ रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम येथील चैतन्य धाम येथे परिसरातील सुमारे ३५० कन्यांचा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांचे पाय स्वच्छ धुऊन पुसून, त्यांचे पूजन करून भोजन व दक्षिणा देण्यात आली. आजच्या नारीने दुर्बल न राहता सबल बनावे त्यासाठी स्वतःचे रक्षण स्वतः करता यावे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अनेक कन्या व महिलांनी मनोगत व्यक्त केले. परिसरातील लहान मोठ्या कन्यांसह असंख्य माता-पिता यांच्यासह जामनेर नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन , कमलताई महाजन, , उत्तम राठोड, विजय पाटील , किशोर नाईक , प्रा उमाकांत पाटील गोकुळ चव्हाण , नटवर चव्हाण , विठ्ठल जाधव , नीलेश चव्हाण बन्सीलाल चव्हाण , हरी महाजन, विकास पवार,सुनील पवार, बद्रि राठोड, अविनास पवार गणेश राठोड ,विश्वनाथ चव्हाण दीपक चव्हाण यांची उपस्थितिती होती. शेवटी आभार चैतन्य धाम चे सचिव रविंद महाजन यांनी मानले.



+ There are no comments
Add yours