*जामनेरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
मा.नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह समाज बांधवांच्या हस्ते झाले प्रतिमापूजन.
जामनेर(प्रतिनिधी):- शहरातील आदिवासी कोळी वाल्मिकी उत्सव समितीच्या वतीने महाकाव्य रामायणाचे रचनाकार आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील एकतेचा, सन्मानाचा आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या या जयंती सोहळ्याला परिसरातील समाज बांधवांनी तसेच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ार्यक्रमाची सुरुवात हि महर्षी वाल्मिकी मंगल कार्यालय येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी “रामायण” या महाकाव्याचे रचनाकार आणि आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली गेली. याप्रसंगी मा.नगराध्यक्षा साधनाताई महाजन,ॲड. चेतन पाटील भाजपा महाराष्ट्र मच्छीमार सेल अध्यक्ष, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, जितू पाटील,शरद पाटील,दिपक तायडे,मयुर पाटील, प्रशांत भोंडे,अतिष झाल्टे, मुकेश सोनवणे, सुभाष सोनवणे बाळासाहेब शेंगदाणे पंढरीनाथ वाघ, पंडित जोहरे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर संतोष कोळी, दिनेश वाघ, विनोद कोळी, रघुनाथ कोळी,दिपक जोहरे, प्रकाश बोरसे, कवी अशोक कोळी, विनोद सोनवणे,गोपाल कोळी, देविदास कोळी, उमेश कोळी, भैय्या बोरसे,नाना बोरसे, डॉ अनिल सोनवणे, विनोद पाडळसे,श्रावण कोळी, कृष्ण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव संपन्न झाला.सोहळ्याचे सूत्रसंचालन कवी अशोक कोळी यांनी केले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours