जामनेर (प्रतिनिधी):- शहरातून गिरीश भाऊ महाजन यांना एकतर्फी मताधिक्य मिळेल असा विश्वास जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीस्कर (नाना भाऊ) यांनी शहारत सूरू असलेल्या वार्ड क्र.८ मधील प्रचार रॅली मध्ये केले आहे. विधानसभेचा बिगूल वाजल्या पासून येथील निवडणूक ही एकतर्फीच होईल असेच मतदार संघात बोलले जात आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या ३० वर्षापासून तालुक्यावर माजी मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांचीच एकहाती सत्ता असून त्यांच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास मोठ्या प्रमाणात सूरू आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण द्यायचे झाल्यास शहरातील विविध भागात आज रोजी रस्ते, गटारी, अंडर ग्राउंड गटारी, पेव्हर ब्लॉक,पाईप लाईन, लाईट आणि विविध समाजाला दिलेले सभा मंडप अशी विविध कामे युद्ध पातळीवर सूरू आहेत. त्यामुळे शहरातील सुज्ञ मतदार गिरीश भाऊ महाजन यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणार असल्याने व शहरातील तरूण वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात भाऊंच्या प्रचारात सहभागी होत असल्याने गिरीश भाऊ महाजन यांना शहरातून मताधिक्य मिळाल्या शिवाय राहणार नाही . तसेच प्रचार रॅली सूरू असताना शहरातून कुठेही विरोधाभास दिसून येत नसल्याने भाऊंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज उभी असतांना त्यांना ७ व्यांदा विजयी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. असा विश्वास नाना भाऊ बावीस्कर यांनी व्यक्त केला.त्यासोबतच डॉ.प्रशांत भोंडे यांनी सुद्धा गिरीश भाऊ महाजन हे तालुक्यातून रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. नाना बावीस्कर,डॉ. प्रशांत भोंडे, अजय नाईक,आबा कुलकर्णी, जयेश पाटील, डॉ. संजीव पाटील, दिनकर पाटील, अशोक पाटील, माधव चव्हाण, प्रल्हाद सोनवणे, मनीष पाटील, गोपाल महाजन, डॉ. बाजीराव पाटील, अशोक चिप्पड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते वार्ड क्र.८ मधील प्रचार रॅलीला उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours