*स्व.त्र्यंबक चव्हाण यांच्या स्मरणार्थ रामदेव बाबा समाधी स्थळी निःशुल्क ट्रकभर पाणी बॉटल वाटप.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

जामनेरच्या चव्हाण दांपत्यांनी केले राजस्थानात जल पुण्ण्याचे काम.

जामनेर (प्रतिनिधी ):- शहरातील आनंद नगर येथील रहिवाशी देवीदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती गिरीजा चव्हाण या दांपत्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच स्व.त्र्यंबक झामसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ राजस्थानातील रामपूर ते रामदेवरा जैसलमेर देवदर्शन यात्रा निमित्त आलेल्या भाविकांना ट्रकभर पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे निःशुल्क वाटप करून भाविकांची तहान भागवली आहे.

त्याचे सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातून व महाराष्ट्रातून दरवर्षी हजारोच्या संख्येने रामदेव बाबांचे भक्त राजस्थान येथील रामदेवरा जैसलमेर येथे बाबांच्या समाधी स्थळी जात असतात.तेथे उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी चवीने खारट लागत असल्याने जामनेरच्या उभयतांनी भाविकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्रातूनच ट्रकभर पिण्याचे पाणी बॉटल आपल्या सोबत घेऊन त्याठिकाणी उपस्थीत असलेल्या भाविक भक्तांना आपल्या परिवारासह निःशुल्क वाटप करून जामनेरचे नाव राजस्थान राज्यात पोहचवून एक आदर्श प्रस्थापित केला आहे.त्यांच्या या कार्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या वर्षी सुद्धा या दांपत्यांनी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना स्वखर्चाने राजस्थानातील रामदेवरा जैसलमेर याच ठिकाणी बाबा रामदेव यांच्या समाधीचे दर्शन घडवून आणले होते. अशा अनेक धार्मिक कार्यात देविदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती गिरीजा चव्हाण या नेहमीच अग्रेसर राहत असतात.त्यांच्या या कार्याचे तालुका भरात कौतुक होतांना दिसून येत आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours