पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेरात भाजपातर्फे खडसे यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध.
जामनेर (प्रतिनिधी):- महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलास्यानंतरही आ.एकनाथराव खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला हे वर्तन निंदनीय, लज्जास्पद आणि काळिमा फासणारे असल्याचे मत जामनेर भाजप च्या वतीने व्यक्त करत त्याचा निषेध म्हणून जामनेरात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत येथील राजमाता जिजाऊ चौकात आमदार एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात येऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जळगांव पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जा. ता. एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, महेन्द्र बावीस्कर, स्वीय सहाय्यक दीपक तायडे, माजी नगरसेवक अतिश झालटे, शहर अध्यक्ष रवींद्र झालटे , माजी जिल्हा परिषद सभापती प्रदीप लोढा,खलील भांझा, जितेश पाटील, उल्हास पाटील, सुहास पाटील यांच्या सह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



+ There are no comments
Add yours