पाडळसे सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ८५९.२२ कोटीचा निधी मंजूर.
जामनेर – पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा PMKSY-AIBP योजनेत समावेश; ८५९.२२ कोटींचा केंद्रीय निधी मंजूर.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी ₹८५९.२२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रकल्पाच्या व्यापक महत्त्वामुळे केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून उत्तर महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात जलसिंचन क्रांती घडून येणार असल्याने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला वेग येणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सिंचनाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा शक्य होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयासाठी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन, केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील आणि मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे मा.ना.गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री) यांनी आभार व्यक्त केले आहे.

+ There are no comments
Add yours