*बिबट्याच्या हल्यात बालकाचा मृत्यू.

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

बिबट्याच्या हल्यात बालकाचा मृत्यू.

यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना.

यावल/रावेर (प्रतिनिधी) :-  जळगाव जिल्हा वन विभागाच्या यावल तालुक्यातील पश्चिम वन कार्यक्षेत्रात दि.६ रोजी दु. ३.३० च्या सुमारास बिबटच्या हल्ल्यात ७ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यावल परिसरात शोककळा पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

त्याचे सविस्तर असे की, यावल तालुक्यातील गानकी शिवारात केशा प्रेमा बारेला वय – ७ हा मुलगा त्याच्या आई सोबत शेतामध्ये जात असतांना बिबट ह्या नरभक्षक बनलेल्या प्राण्याने मुलावर अचानक हल्ला करत त्याला त्याच्या आईच्या हातातून ओढत केळीच्या बागेत नेले. मुलाच्या आईने जोरदार आरडा ओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. त्यावेळी मुलाला केळीच्या बागेत सोडून बिबट्याने पळ काढला.मात्र मुलगा या झटापटीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील गाव खेड्यासह यावल, रावेर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच  नागरिकानी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वनविभागाचे कर्मचारी मात्र उशीरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून आले.एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगा नरभक्षक बिबट्याच्या हल्यात आपल्या जीवास मुकला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत अल्पवयीन आदिवासी मुलाचे कुटुंब मध्य प्रदेश रहिवाशी होते. सहा महिन्यापूर्वी साकळी शिवारात मजुरीचे काम करायला आले असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बिबट्या बाबत परिसरात दवंडी देऊन अलर्ट राहण्याच्या सूचना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिल्या आहेत.नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी वनविभागाकडे व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे उपस्थीत आदिवासी बांधव व नागरिकांनी केली आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours