निकालासाठी शासकीय यंत्रणा सज्ज.
सकाळी ८ वाजे पासून मत मोजनीला होणार सुरुवात .
जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणूक दी.२० रोजी पार पडली असून महायुतीचे उमेदवार गिरीश भाऊ महाजन व महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्यात चुरस बघायला मिळाली.मतदार संघातील मोठ्या गवांमध्ये भाजप तर ईतर गावांमध्ये महाविकास आघाडी पुढे असल्याच्या चर्चा होतांना २ दिवसांपासून दिसून येत होते. भाजपच्या प्रमूख नेत्यांनी मतदार संघातून ३० हजार पेक्षा जास्त लीड गिरीश भाऊ महाजन यांना राहणार असल्याने तेच पुन्हा ७ व्यांदा निवडून येतील असे भाकीत केले आहे. तर दिलीप खोडपे सर एक मताने का होईना या वेळी निवडूण येतील अशा चर्चा तालुक्यात होतांना दिसून येत आहेत. एकंदरीतच दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत कैद असल्याने. तालुक्यात कुठे हजारो रुपयांच्या, कुठे लाखो रुपयांच्या पैजा खोडपे सरांच्या बाजूने लागल्या असल्याच्या फक्त चर्चा होतांना दिसून येत आहेत.मतदार संघात पैजांचा निव्वळ फार्स दिसून येत असल्याने खरी पैज कुठेही लागल्याचे दिसून येत नाही. मतदार संघात पैजांचे पेव फुटले असून जो तो ज्याच्या त्याच्या परीने अंदाज बांधत आपलाच उमेदवार विजयी होईल असे पटवून देतांना दिसून येत आहेत.
शासकीय यंत्रणा निकालासाठी सज्ज
उद्या दी.२३ रोजी येथील शासकीय धान्य गोदाम क्र.२ उत्तरेकडील खोली,जळगाव रोड,जामनेर येथे सकाळी ८ वाजेपासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. ई व्हि एम मतदान यंत्रणेच्या मोजणीकामी १४ टेबल, सेना दलातील मतदारांसाठी १ टेबल व टपाली मतपत्रिकाकरीता एकुण ७ टेबल असे एकुण २२ टेबल निश्चित करण्यात आलेले आहे.सदर मतमोजणी कामी थ्री स्तरीय पोलीस सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक टेबलकरीता १ मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे एकूण २२ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे टेबलकरीता १ (केवळ उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी उपस्थित नसल्यासच) असे एकुण २३ प्रतिनिधी उमेदवारांस नेमता येतील. याबाबत सर्व उमेदवारांना लेखी कळविण्यात आलेले आहे. प्रत्येक मतमोजणी टेबल करीता १ मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, १ सुक्ष्म निरीक्षक तसेच टपाली मतमोजणी कामी टेबलनिहाय अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. EVM मतमोजणी एकूण १४ टेबलवर घेण्यात येणार असून एकुण २५ फेऱ्या मध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.वैध ओळखपत्र असणा-या मतमोजणी प्रतिनिधीनांच मतमोजणी हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार असुन दि.२३ शनिवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी ओळखपत्रासह मतमोजणीसाठी शासकीय धान्य गोदाम क्र. २ उत्तरेकडील खोली,जळगाव रोड,जामनेर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी नाना साहेब आगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
+ There are no comments
Add yours