*अस्तित्व फाउंडेशन रांची यांचे कडुन शालेय साहित्य वाटप.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

अस्तित्व फाउंडेशन रांची यांचे कडुन शालेय साहित्य वाटप.

जामनेर (प्रतिनिधी):- अस्तित्व फाउंडेशन रांची या सेवाभावी संस्थेकडुन जि प मराठी शाळा प्रिंपी , टाकळी, मेहगाव या मराठी शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनींना वही,पेन पेन्सिल,पाटी साहित्य वाटप करण्यात आले. अस्तित्व फाऊंडेशन नेहमीच राज्यातील गरीब होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असते. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उदात्त हेतूने अस्तित्व फाउंडेशन रांची चे अध्यक्ष कृती श्रीवास्तव माजी यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील पिंपरी, टाकळी आणि मेहगाव या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृती श्रीवास्तव माजी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितलेकी, अशीच मदत इतर शाळेतील मुलांना सुद्धा भविष्यात आमच्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल. शालेय साहित्य वाटप करतांना साहित्य मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपण केलेल्या मदतीचे फळ मिळाल्याचे ते शेवटी म्हणाले.यावेळी शाळेचे मुख्यधापक शिक्षक वृंद यांनी अस्तित्व फाऊंडेशन चे अभार व्यक्त केले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours