पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
शिवजयंती निमित्त विजयानंद हॉस्पिटल आयोजीत रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद.
८२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
जामनेर (प्रतिनिधी):- १९ फेब्रुवारी हा दिवस देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दीन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो.जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने विजयानंद हॉस्पीटल चे संचालक डॉ.नंदलाल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत सेवालाल महाराज , स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराज व श्री संत रविदास महाराज या सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याकरीता विजयानंद हॉस्पिटल येथे दी.१९ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ८२ महीला आणि पुरुष रक्तदात्यांनी स्वयंस्पूर्तीने रक्तदान केले.रक्तदात्यांचे डॉ.नंदलाल पाटील यांनी आभार व्यक्त करून त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतील असा विस्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. विजया पाटील, डॉ नंदलाल पाटील,प्रल्हाद बोऱ्हाडे, प्रफुल्ल पाटील ,महेश राणे, नितीन झोपे, अभिनंदन जैन, मनोज माळी, स्वप्नील पाटील अंगद पाटील ,वैभव माळी ,डॉ. मंदार पाटील डॉ. शुभम साळवे ,डॉ. साक्षी पाटील ,डॉक्टर जोशना पाटील, नवलसिंग गुरुजी, अनंतराव पाटील ,भगवान ओंकार पाटील, संजय पाटील, डॉ. गजानन पाटील, कैलास पाटील, अरुण पाटील ,अनिरुद्ध पाटील, संदीप पाटील, डॉ. मनोज पाटील खादगावकर , नितीन भोई, संतोष नाईक आदींची उपस्थिती होती.
+ There are no comments
Add yours