*विचाराच्या घालमेलीत वडिलांचे पार्थिव घरात ठेवून मुलाने दिला १० वीचा पेपर.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

 विचाराच्या घालमेलीत वडिलांचे पार्थिव घरात ठेवून मुलाने दिला १० वीचा पेपर.

जामनेर(प्रतिनिधी):-  तालुक्यातील केकतनिंभोरा येथे वास्तव्यास असणारे  संतोष भावलाल पांचाळ वय – ४० यांचे दी.२१ रोजी सकाळीच अकस्मात निधन झाले असून ते आपल्या परिवाराचा उदर निर्वाह मोल मजूरी करून करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

त्याचे सविस्तर असे की,केकतनिंभोरा येतील होतकरू व मोलमजुरी करणारा कर्ता पुरुष संतोष पांचाळ यांचे दि.२१ रोजी सकाळी अकस्मात निधन झाले. संतोष पांचाळ यांना ३ मुले असून त्यांचा गजानन नावाचा मुलगा गावातील कै.सेट दौलत मोतीराम जगताप आश्रम शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत होता .आज १० चे पेपर सुरू झाल्याने त्याचा नेरी येथील जनता हायस्कूल च्या केंद्रावर पेपर होता. घरात सकाळीच वडिलांचे निधन झाल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.आई, वडील भाऊ,भावंडे आणि नातेवाईक यांच्यासह १० वीचा विद्यार्थी गजानन याच्या डोळ्यातून अश्रू च्या धारा वाहत होत्या.अशा परिस्थितीत पेपरला जायचे कसे या विवंचनेत त्याच्या मनाची घालमेल सुरू होती.एस एस सी बोर्डाची परीक्षा असल्याने पेपर न दिल्यास मुलाचे वर्ष वाया जाऊ शकते. यासाठी गावातील सुज्ञ नागरिक, नातेवाईक आणि शाळेच्या शिक्षकांनी गजाननला धीर दिला.पहाडासारखे दु:ख बाजूला ठेवून जेमतेम १५ वर्षाच्या गजानन ने परीक्षा केंद्र गाठले. जड अंतःकरणाने त्याने ३ तासाचा पेपर दिला. या तीन तासात त्याच्या मनाची काय? घालमेल झाली असेल ही त्याची त्यालाच माहित. पेपर देऊन झाल्यावर वडिलांच्या अंत्यविधी साठी गजानन उपस्थीत झाला.

मयत संतोष यांच्या जाण्याने केकतनिंभोरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांचा मुलगा गजाननचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ३ मुले, १ भाऊ, भावजय ,पुतणे २ बहिणी असा परिवार आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours