पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थीती.
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नाव लौकीक असलेल्या धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त दी.१६ रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे शेंदुर्णी नगरीत येत असून त्यांच्या प्रमूख उपस्थीत अमृत महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार असून समारंभाचे अध्यक्षपद संकटमोचक ना.गिरीश भाऊ महाजन भुषवणार आहेत.

तसेच अमृत महोत्सवी कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जळगांव जिल्हा पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील, ना. संजय सावकारे उपस्थीत राहणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन इमारतीचा पायाभरणी सोहळा, अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन तसेच भव्य शेतकरी मेळावा यावेळी संपन्न होत आहे.
शेंदुर्णी नगरीत एखाद्या कार्यक्रमाच्या रूपाने उपस्थीत राहणारे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ना.देवेंद्र फडणवीस हे तिसरे मुख्यमंत्री ठरत आहेत. या अगोदर येथे त्यावेळेचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार, विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांनी शेंदुर्णी नगरीत उपस्थीत राहून शेंदुर्णी करांना उपकृत केले होते.
तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय दादा गरूड यांनी जामनेर तालुका वाशीयांना केली आहे.
+ There are no comments
Add yours