खोडपे सरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.
जामनेर (प्रतिनिधि):- दी.२८ रोजी जामनेर विधानसभे साठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप खोडपे सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या वेळी बोहरा मंगल कार्यालय पाचोरा रोड येथून स्वतः खोडपे सर बैल गाडीवर स्वार होत भव्य रॅलीचे आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते .

सविस्तर असे की, आज दी.२८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार)पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप खोडपे सर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदार संघातून मोठ्या संख्येने मतदार खोडपे सरांना पाठींबा देण्यासाठी बैल गाडी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. प्रथम त्यांनी राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले .पुढे रॅली भुसावळ चौफुली या ठिकाणी आली असता भिम सृष्टी येथील महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयात नोडल अधिकारी मोरे मॅडम व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खोडपे सर म्हणाले की, या वेळी जामनेर विधानसभेची निवडणूक जनतेने हाती घेतली असून जनमत पाठीशी असल्यामुळे विजयाची पक्की खात्री आहे. भाऊ म्हणत आहेत की, त्यांना १ लाख मतांची आघाडी मिळणार आहे. जर त्यांना १ लाखाची आघाडी मिळणार असेल तर, त्यांना जामनेर मतदार संघ का सोडता येत नाही. गेल्या दोन टर्म पासून ते जनतेला सांगतात की, मी फक्त उमेदवारीचा फॉर्म भरेल प्रचार जनतेच्या भरोशावर असेल मात्र गेल्या वेळे प्रमाणेच या वेळी सुद्धा त्यांना जामनेर मतदारसंघ सोडता येत नाही. खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची जूनीच सवय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते डी के पाटील, किशोर पाटील, राहूल चव्हाण, ज्ञानेस्वर बोरसे , डॉ प्रशांत पाटील, डॉ मनोहर पाटील, यांच्यासह तालुक्यातील नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours