पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
तोंडापुर ता.जामनेर (वार्ताहर):- केंद्र शासनाच्या कार्मिक मंत्रालय यांचेकडून प्राप्त सूचनांचे अनुषंगाने दि.१९ डिसें. ते २४ डिसें.या दरम्यान प्रशासन गाव की और मोहीमेअंतर्गत येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील सर्व १० महसूल मंडळात लोकशाही दिन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लोकांच्या तक्रारी, विविध प्रश्न, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तोंडापुर मंडळातील मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिन साजरा करण्यात आला. जामनेर तालुक्यातील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे महसूल मंडळ तोंडापूर येथे दि.१९ रोजी ठिक ११:०० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तोंडापुर विकास सोसायटीचे चेअरमन कैलास पाटील, पोलीस पाटील जितेंद्र पाटील, तोंडापूर, ग्रामपंचायतचे सदस्य, अधिकारी विजय बागडे, ग्राम महसूल अधिकारी सुनीता वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी मनिष रत्नाणी, ग्राम महसूल अधिकारी गजानन सोमासे, ग्राम महसूल अधिकारी बळीराम घुगे, महसूल सेवक सुनील लोखंडे, महसूल सेवक कौतिक शेजूळ, महसूल सेवक चंद्रशेखर आव्हाळगे, जितेंद्र सपकाळ, जामनेर लाईव्ह तोंडापुर वार्ताहर विठ्ठल चव्हाण, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांनी यावेळी आपले प्रश्न व समस्या याबाबत निवेदने सादर केले असून शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
+ There are no comments
Add yours