*जामनेरात चक्क भरवस्तीत चोरट्यांनी फोडले घर.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

 २० हजार कॅश व ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी करून चोरटे पसार.

जामनेर –  शहरातील न.परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या शिक्षक असलेल्या मुलाच्या घरात चक्क भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. दी.१९ रोजी सकाळी ६:३० ते ११:३० वाजेच्या सुमारास वाकी रोड जामनेर येथील बेस्ट बाजार जवळील नवकार प्लाझा इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ही चोरी झाली असून ५० ग्रॅम सोने व २०,००० रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार सहा. पोलीस निरीक्षक सागर काळे,सचिन महाजन, दीपक जाधव, राहुल महाजन घटनास्थळी दाखल झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार जामनेर मधील नवकार प्लाझा या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असणारे माजी नगरसेवक श्रीराम महाजन यांचे  चिरंजीव किरण महाजन व त्यांची पत्नी दोघेही शिक्षक असून सकाळची शाळा असल्याने ते सकाळी ६:३० वाजता घराला नेहमी प्रमाणे कुलुप लावून शाळेत गेले होते.घरी कुणीही नसल्याने घराला लावलेले कुलुप बघून चोरटयांनी डाव साधला.किरण महाजन सर साधारण ११:३० वाजेच्या सुमारास घरी आले असता.त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे व दरवाज्याच्या कडी कोयंडा तोडलेला असल्याचे आढळून आले.आपल्या घरात चोरी झाल्याची पक्की खात्री झाल्याने त्यांनी घरातील कपाटाकडे धाव घेऊन बगीतले असता त्यांना कपाटातील २०,००० रोख रक्कम व ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले.लागलीच त्यांनी जामनेर पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात घटनास्थळी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक पाचारण करून चौकशी केली असून.आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी यावेळी दिली.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours