चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.विशेष म्हणजे उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देखील दिल्याची माहिती आहे. उन्मेष पाटील यांच्या कुटुंबीयांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत माहिती दिली आहे. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर उन्मेष पाटील यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. गेल्या काही महिन्यांपासून उन्मेष पाटील यांच्याभोवती ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या आठवून पाटील कुटुंबीयांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. यावेळी उन्मेष पाटील यांच्या वडील भैय्यासाहेब पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. उन्मेष पाटील यांच्या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली. तसेच विधानसभेची उमेदवारी देवून एबी फॉर्मदेखील दिला आहे, अशी पाटील उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.
“होय, उन्मेष पाटील यांची उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला”, असं भैय्यासाहेब पाटील म्हणाले. भाजपचे विद्यमान खासदार असताना भाजपने उन्मेष पाटील यांचे जळगाव लोकसभेचे तिकीट कापले होते. यावेळी उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. “उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. एका डोळ्यात अश्रू तर एकाडोळ्यात दुःख आहे”, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.
+ There are no comments
Add yours