जामनेर विधानसभेसाठी दोन दिवसात ३८ अर्ज विक्री.दोन अपक्ष उमेदारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल.

जामनेर (प्रतिनिधि):- महाराष्ट्र विधान सभेचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने दी.२२ पासून सूरू झाला असून महायुतीची उमेदवारी अपेक्षे प्रमाणे गिरीष भाऊ महाजन यांना जाहीर झाली असून त्यांच्या प्रचार सभा सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीचे गिरीष भाऊ यांचे ३० वर्षांपासूनचे सहकारी असलेले माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले दिलीप खोडपे सर उभे ठाकले आहेत. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा व्हायची असली तरी त्यांनाच उमेदवारी मिळेल हे नक्की असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांचाही प्रचार मतदार संघात जोरदार सूरू झाला आहे. खोडपे सरांची पाळधी येथील सभा जोरदार झाल्याची चर्चा मतदार संघात होत असतांनाच गिरीष भाऊ यांनी पहूर येथे आज दी.२३ रोजी घेतलेली सभा लक्षवेधी ठरली आहे. जामनेर मतदार संघात खरी टक्कर या दोघ एके काळीचे सहकारी असलेल्या उमेदवारांमध्येच होणार असून गिरीष महाजन यांचे पारडे आज रोजी भक्कम असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.

दोन दिवसात २५ उमेदवारांकडून ३८ नामनिर्देशन पत्र खरेदी केले असून मोहम्मद समीर युनूस शेख व परवेझ आलम अब्दुल रशीद शैख या दोघ उमेदवारांनी आपले अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours