पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंडे साहेबांचा स्मुर्तिदिन साजरा.
जामनेर – महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री,उपमूख्यमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती येथील मा.गिरीष भाऊ महाजन यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. स्वकर्तृत्वावर तळागाळातील कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी संघटनकौशल्य, प्रभावी वक्तृत्व, अफाट जनसंपर्काच्या माध्यमातून महाराष्ट्रात नवचैतन्य पेरले. गाव-खेडी, वाडी-वस्त्यांसह भाजप सर्वदूर पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

संघर्षनायक लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कणखर नेतृत्वाने आणि सर्वव्यापी विकासाभिमुख धोरणांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श सदैव पुढील पिढीला दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे. मुंडे साहेबांच्या स्मुर्ती दिनानिमित्त भाजप कार्यालयात मुंडे साहेब अमर रहे चा जयघोष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.यावेळी गिरीश भाऊ महाजन यांचे स्वियसाह्यक दिपक तायडे, भाजप युवक शहराध्यक्ष रविंद्र झाल्टे, माजी नगरसेवक अतिष झाल्टे, बाबूराव आण्णा हिवराळे, उल्हास पाटील, सुभाष पवार, कैलास पालवे, ज्ञानेश्वर माऊली, राजेश नाईक, राहूल पाटील, सुरेश महाजन(पत्रकार), रूपेश बिऱ्हाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours