*मोटारसायकल झाडाला धडकल्याने जामनेरच्या तरुणाचा मृत्यू.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

पुढील उपचारासाठी जळगांव नेत असताना वाटेतच प्राण ज्योत मालवली.

जामनेर –  शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवाशी मनोज बावीस्कर वय २८ हा तरूण काही कामानिमित्त हीवरखेडा रोडने आपल्या मोटार सायकलने सकाळी ११ वाजेच्या सुमारास जात असताना त्यांचा मोटारसायकल वरील ताबा सुटल्याने मोटारसायकल झाडाला धडकून अपघात झाला होता.या अपघातात मोटारसायकल चालक मनोज बावीस्कर हा तरुण गंभीर जखमी झाला होता .त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येऊन प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी जळगांव जिल्हा रुग्णालयात रवांना करण्यात आले होते.मात्र जळगांव जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली असून घरातील कर्ता व एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेला तरूण क्षणात निघून गेल्याने मनोजच्या कुटुंबियांवर व मित्र परिवारावर वज्रघात झाला आहे.त्याच्या जाण्याने जामनेरात शोककळा पसरली  आहे. त्याच्या पश्चात आई, एक बहीण असा परीवार आहे.

या अपघाताने शास्त्री नगर भागातील रहिवाश्यांमधून  हळहळ व्यक्त होत आहे. 

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours