*चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन महाशिवरात्री निमित्त मुलांना फराळ आणि दुध वाटप.*

चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन महाशिवरात्री निमित्त मुलांना फराळ आणि दुध वाटप.

जामनेर (प्रतिनिधी):- देशात महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. याचाच भाग म्हणून तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या निमखेडी येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन विरार यांच्याकडून गावातील मुलांना दुध पाकिटे आणि फळे वाटप करण्यात आली. तसेच तालुक्यातील फत्तेपुर येथील काही गरजु कुटुंबांना फाऊंडेशन च्या वतीने फराळ म्हणून साबुदाणा खिचडी फळे,दुध वाटप करण्यात आले.

 फराळ आणि दुध पाकिटे मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन नेहमीच मुलांच्या हितासाठी, वयो वृध्द यांच्या सेवेसाठी कार्यतत्पर असते. भविष्यात असेच सामाजिक उपक्रम ग्रामीण भागात जाऊन करत राहू असे आश्वासन चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष संदीप सिंग यांनी या प्रसंगी दिले.यावेळी अमरिन पेंटर ट्रस्टी, रिना नवले, अवंतिका महाडिक,राकेश नेमन, राहुल रॉय मुळे,वैभव खेडेकर, वैभव गाढे यांनी परिश्रम घेतले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours