*बालविवाह रोखण्यासाठी जामनेरात विद्यार्थ्यांचा जागर

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

जामनेर –  येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दी.५ रोजी पोलीस स्टेशन परिसरात बालविवाह रोखण्यासाठी जनतेला संदेश पोहचविण्याच्या उद्देशाने जागर घालून जनजागृती केली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी युवाशक्ती बालविवाह निर्मूनलासाठी सक्षम दिवस कार्यक्रम आयोजीत केला होता. यात बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेऊन एका उज्वल भविष्यात बाधा आणू नका बालविवाह होऊ देऊ नका असे स्लोगन असलेले पोस्टर झळकवित जनजागृती केली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी, विद्यार्थिनी , शिक्षक व जामनेर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्माचारी व शहारातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours