*चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन दिव्यांग बाधवांना ब्लँकेट आणि चटई वाटप.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

राहूलरॉय मुळेंचा स्तुत्य उपक्रम.

जामनेर – जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने तालुक्यातील फत्तेपूर येथील सरस्वती ईंग्लिश स्कूल मध्ये दीव्यांग बांधवांना चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन ब्लँकेट आणि चटई वाटप करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विरार येथील चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे संदीपशिंग यांनी भूषविले. त्यांच्याच हस्ते गरजवंत दिव्यांग बाधवांना ब्लँकेट व चटई चे वाटप करण्यात आले.यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, दिव्यांग बांधव कायम त्यांच्या हिमतीने लढत असतो, त्यांना भविष्यात जे काही मदत लागेल ती मदत आमच्या परीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करत राहु असे अभिवचन त्यांनी दिव्यांग बांधवांना दिले. फत्तेपूर परिसरातील, किन्ही, पिंपळगाव, लोणी,मेहगाव पिंपरी,निमखेडी या गावातील दिव्यांग बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे अमरिन पेंटर ,वैभव खेडेकर, राकेश नेमन, रिना नवले यांच्यासह राहूलरॉय मुळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून दिव्यांग बांधवांना ब्लँकेट आणि चटई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. कार्यक्रम चे नियोजन राहुलराॅय मुळे आणि योगिताताई चोधरी यांनी केले तर सुत्रसंचलन मनोज पाटील, मनोज शिदे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन राहुलराॅय मुळे यांनी केले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours