पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
मुंबई – मा.राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला. यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या एकमुखी पाठिंब्याने मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी देण्यात आले असून उद्या दी.५ रोजी मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजीत दादा व शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असा तिघांचा शपथ विधी उद्या होणार असल्याचे मत मा. गिरीश भाऊ महाजन यांनी व्यक्त केले आहे. उर्वरीत मंत्री मंडळाचा विस्तार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होणार असल्याचे सुद्धा गिरीश भाऊ महाजन यांनी सांगीतले आहे.

देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती सरकार महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणार हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला विश्वास असून उद्या पासून देवेंद्र फडणवीस पर्व २ सूरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची गट नेते पदी निवड होताच जामनेरात राजमाता जिजाऊ चौकात भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व संभाव्य मंत्रिमंडळाचा शपथविधी येथील राजमाता जिजाऊ चौकात ४:३० वाजता ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे. तरी नागरिकांनी,पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व लाडक्या बहिणींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जामनेर भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
+ There are no comments
Add yours