*जामनेरचे पो.उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांचा पो अधीक्षकांनी केला गौरव.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

जामनेर –  विधानसभा निवडणुकीत आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी पोलीस निरीक्षक कासार यांच्या आदेशाने उपनिरिक्षक जयसिंग राठोड यांच्या टीमकडून जामनेर-पहूर रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती.यावेळी उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी एका चारचाकी वाहनाची झाड झडती घेतली असता त्यात तब्बल १७,२६,४०० रोख रक्कम आढळून आली होती.ती रक्कम  जप्त करुण संबंधितावर कारवाई करण्यात आली होती.

निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता, शांततेत आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पडल्या याकाळात जयसिंग राठोड यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांच्या सेवेची दखल घेत जळगांव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जयसिंग राठोड यांना प्रशंस्तीपत्र प्रदान करुण त्यांना गौरविण्यात आले.या कामगीरी मुळे त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours