*जामनेरात विधी सेवा समीती व वकील संघाच्या वतीने संविधान रॅलीचे यशस्वी आयोजन.*

पंढरीनाथ पाटील/ जामनेर लाईव्ह

 जामनेर –  तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ जामनेर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल दिन आणि संविधान दिन यानिमित्त जामनेर न्यायालयातून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर विद्यालयाच्या विद्यार्थ्यासह रॅली काढण्यात आली.तसेच न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास अँड.एस.व्ही.फाशे ,श्रीमती पालवे मॅडम, केंद्रप्रमुख सुरवाडे सर, माळी सर , पी व्ही सुर्यवंशी साहेब, आणि दि.न.चामले साहेब तसेच मुख्याध्यापक महाजन सर यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरास तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.एम . चौधरी तसेच सचिव अँड.एम.बी.पाटील सरकारी वकील ॲड.कृतिका भट अँड.अनिल सारस्वत तसेच श्री व सौ.चंदले, अँड.डी.व्ही.राजपूत तसेच न्यायालयीन कर्मचारी व शिक्षक वृंद तसेच पोलीस कर्मचारी व इतर मान्यवर हजर होते. सदर शिबीरात भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours