*संकटंमोचकांनी यशस्वी पार केली आमदारकीची सप्तपदी.(निवडणूक विश्लेषण)*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

  २००४ नंतर पहिल्यांदाच निवडणूकीत चुरस दिसून आली

. जामनेर:- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जामनेर च्या जनतेने पुन्हा ७ व्यांदा गिरीश महाजन यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.गिरीश महाजन यांची गेल्या ३० वर्षापासून मतदार संघावर मजबूत पकड असून ग्रामपंचायत ते स्थानीक स्वराज्य संस्था त्यांच्याच ताब्यात असून कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे असल्याने अगदी बूथ लेव्हल पासून  त्यांचे नियोजन असल्याने व कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी ते चोक बजावत असल्याने त्यांचा विजय नीच्चीत मानला जात होता.फरक फक्त मतांचा होता.गेल्या आडीच वर्षात महाजन यांनी मतदार संघात विकास कामांचा झपाटाच सूरू केला असल्याचे दिसून आले.एकंदरीतच गिरीश महाजन यांचे विकासाचे व्हिजन यशस्वी झाल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. यावेळी शहरासह तालुक्यात झालेले व सूरू असलेले विकासाचे कामे आणि मतदार संघातील लाडक्या बहिणीनी , लाडक्या भावांनी, कर्ज बाजारी शेतकऱ्यांनी, बांधकाम कामगार आणि नोकरदार वर्गाने गिरीश महाजन यांना भर भरून मतदान केले यामुळे त्यांना २८,८८५ मतांचे मताधिक्य प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप खोडपे यांचा पराभव करून मिळाले. एक गोष्ट मात्र ह्या निवडणुकीत दिसून आली ती म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना निवडणूकीत जनतेमधून थेट देणगी स्वरुपात आर्थिक रसद पुरवली जात असल्याचे व जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र मतदार संघात शेवट पर्यंत दिसून आले.

जामनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक विश्लेषक

गेल्या ६ विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक चुरशीची ठरल्याचे जाणकारांचे मत असून दोन महिन्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार) प्रवेश केलेले दिलीप खोडपे सरांनी तब्बल १,०१७८२ मते घेऊन गिरीश महाजन यांच्या पुढे तगडे आव्हान उभे केले होते यावरून दिसून येते.मतदार संघातील मोठ्या गावांमध्ये गिरीश महाजन यांना मतांची मोठी लीड मिळाल्याने छोट्या गाव खेड्यात मिळालेली मतांची आघाडी खोडपे सरांसाठी कुचकामी ठरल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात मराठा फॅक्टर चे चित्र रंगवल्या गेले मात्र याचा परीणाम मतपेटीत दिसून आला नाही. मतदार संघात १३५००० मते हे मराठा समाजाचे असल्याने व दिलीप खोडपे हे मराठा समाजातून येत असल्याने त्यांना जर ही मते एक गठ्ठा मिळाली असती तर खोडपे सर हे मोठ्या मताधिक्याने विजयी ठरले असते. आज त्यांना मिळालेले मतदान हे एकट्या मराठा समाजाचे नाही. त्यात ईतर समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघात फक्त मराठा कार्डचा वापर केला गेला. तो कोणी केला हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. समाजासाठी शून्य योगदान असलेल्या काही  लोकांकडून मराठा समाजात फूट पाडण्याचा केवीलवांना प्रयत्न केला गेला त्याचा परीणाम मतदानावर कितपत झाला असेल हा सुद्धा एक संशोधनाचा भाग ठरू शकतो असे एकंदरीत चित्र मतदार संघात दिसून आले. शेवटी गिरीश महाजन यांनी विकासाची गंगा मतदार संघात उतरवल्या मुळेच त्यांचा ७ व्यांदा विजय झाला असून अपूर्ण राहिलेल्या विकास कामांना यामुळे गती मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्याने गिरीश महाजन यांचे राज्य सरकार मध्ये अजूनच वजन वाढले असून त्यांना वजनदार खाते मिळावे अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.सरकार स्थापन झाल्या नंतर लवकरच स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असून या विजयामुळे महायुतीचे होसले बुलंद झाल्याचे दिसून येते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours