*आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष असून आमचे नेते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे – गिरीश भाऊ महाजन *

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

 जामनेरात गिरीश भाऊंचाच डंका. मतदार संघात गाव निहाय मतदान.

गिरीश भाऊ महाजन २६,८८५ मतांची आघाडी घेऊन विजयी.

जामनेर (प्रतिनिधी):- जामनेर मतदार संघात गिरीश भाऊ महाजन यांचाच डंका सुरुवातीच्या कलांपासुन दिसून आला आहे. तरीही खोडपे सरांनी गिरीश भाऊ महाजन यांना काही प्रमाणात टक्कर दिल्याचे ग्रामीण भागातून दिसून आले.

गिरीश महाजन यांना १,२८६६७ मते घेऊन ते २६,८८५ मतांची आघाडी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप खोडपे सर ( १,०१७८२) यांच्यावर घेऊन ते सतत ७ व्यांदा विजयी झाले असून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे .आता पर्यंत रेकॉर्ड ब्रेक मतांनी त्यांनी विजय संपादन केला. गिरीश भाऊ महाजन यांच्यासाठी कोणताही फॅक्टर जामनेरात चालत नसून गिरीश महाजन हेच फॅक्टर/ब्रँड यावरून दिसून येते. त्यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ७ व्यांदा विजयश्री खेचून आणली आहे. त्यांच्यासाठी मतदार संघात एकाही मोठ्या नेत्यांची/ स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. गिरीश भाऊ महाजन हे स्वतः मतदारसंघात प्रचार करतानाही दिसून आले नाही.त्यांच्या वतीने सौ. साधनाताई महाजन व भाजपचे कार्यकर्ते यांनी मतदार संघ पिंजून काढला. 

@ विजयाचे श्रेय गिरीश भाऊ महाजन यांनी सौ. साधनाताई महाजन व कार्यकर्त्यांनाच दीले असून महाराष्ट्रात महायुतीला विकास कामांच्या जोरावर मतदारांनी भरघोस पाठींबा दिला आहे. महाराष्ट्र महायुतीच्या मागे उभा राहीला असून लाडक्या बहिणी चा आमच्या विजयात खारीचा वाटा आहे . महायुतीत आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून आमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे.त्यांना आपण उपमुख्यमंत्री होणार का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्ष जे जबाबदारी देईल ती आम्ही स्वीकारत असतो असे मत गिरीश भाऊ महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.

@ तर जामनेर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की , प्रथम मी गिरीश भाऊ महाजन यांना विजयाच्या शुभेच्छा देतो , त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे अभिनंदन करतो. त्यांनी मला अगदी तन मन धनाने मदत करुन संपूर्ण मतदार संघात बलाढ्य अशा उमेदवारा समोर लढण्याचे बळ दीले.तरीही मतदार संघात EVM मशीन मध्ये घोळ असल्याची मला शंका वाटते. शेवटी विजय विजय असतो. त्यामुळे मी भाऊंना पुन्हा शुभेच्छा देतो.

मतदार संघात झालेले टोटल मतदान पोस्टलसह (२,३९१३५)

जामनेर मतदार संघात उभे असलेले १० उमेदवार व  नोटा यांना मिळालेले मतदान.

१) खोडपे दिलीप बळीराम महाविकास आघाडी  (१,०१७८२)२).गिरीश दत्तात्रय महाजन भाजप (१,२८८८५) ३) विशाल हरिभाऊ मोरे बहुजन समाज पार्टी (८६०) ४)अण्णासाहेब रामचंद्र राठोड(हिंदु समाज पार्टी)- (१८८) ५)प्रभाकर पंढरी साळवे(राष्ट्रीय समाज पक्ष)(१८४) ६)मदन शंकर चव्हाण(भारतीय जन सम्राट पार्टी)(१३८) ७)अनिल रंगनाथ पाटील- अपक्ष (२२३)

 ८)दिलीप मोतीराम खामंकर- अपक्ष(२३३६) ९)राजेन्द्र सुभाष खरे – अपक्ष (३७९)१०)राहूल राय अशोक मुळे – अपक्ष(२०९५) नोटा (२१४२) आणि रिजक्टेड (१४१) असे मते उमेदवारांना मिळाले आहेत.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours