जामनेर(प्रतिनिधि ):- विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रचारार्थ आज दि .१२ रोजी सौ.साधनाताई महाजन यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये आपल्या माणसांशी आपुलकीने संवाद साधला. गिरीश भाऊ महाजन यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा गिरीश भाऊ महाजन यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार ग्रामस्थ करत असल्याचे दिसून येत होते.जामनेरच्या प्रगतीला साथ देणार असल्याची ग्वाही मतदारांनी या वेळी दिली. यावेळी प्रा.शरद पाटील, अमित देशमुख, प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, दिलीप रदाळ,यांच्यासह पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.निता पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रयाग कोळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



+ There are no comments
Add yours