जामनेर (प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप खोडपे (सर) यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे उद्या दी.१४ रोजी दुपारी १: ३० वाजता संसदरत्न खा. अमोल कोल्हे यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन खोडपे सरांच्या वतीने करण्यात आले आहे. जामनेर शहरातून दुपारी १:३० वाजता रोड शो ला सुरूवात होईल तर पहूर येथे दुपारी २.२० ला, पाळधी येथे २.४५ वाजेला तर शेवटी लोहारा येथे ३.१० वाजता जामनेर मतदार संघातील या गावांमधे रोड शो आयोजित करण्यात आला आहे. तरी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोड शो साठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*जामनेरात खोडपे सरांसाठी खा.अमोल कोल्हेंच्या रोड शो चे अयोजन.*

+ There are no comments
Add yours