*जामनेरपूरा येथून महायुतीचे उमेदवार गिरीष महाजन यांच्या समर्थानर्थ निघाली रॅली.*

जामनेर (प्रतिनिधी):- येथील महायुतीचे उमेदवार गिरीष भाऊ महाजन हे गेल्या ३० वर्षापासून तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असून ते विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. जामनेर तालुक्यात भाजप कडे निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने कार्यकर्त्यांच्या भरोषावर जामनेर विधानसभेची निवडणूक गिरीश भाऊंनी सोडली असून ते महाराष्ट्रातील महायुतीच्या इतर मतदार संघात प्रचार कार्यात व्यस्त असल्याने कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतली असल्याची परिस्थितीत शहरातील जामनेरपुरा येथील प्रचार रॅली वरुन दिसून येते. प्रचारात मतदारांच्या घरो घरी जाऊन महायुतीचे पत्रक वाटप करुन गिरीश भाऊ महाजन यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन रॅली मधील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते. यावेळी रॅली मध्ये भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,माजी नगरसेवक बाबूराव हिवराळे, सुभाष पवार, विलास माळी, अमोल महाजन, संजय सूर्यवंशी, विलास हिवराळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रचार रॅली मध्ये सहभागी झाले होते.

तसेच  शहरातील माळी गल्ली मध्ये साधनाताई महाजन यांच्या उपस्थितीत महीला प्रचार रॅली काढण्यात आली होती. यावेळी महिलांनी सौ. साधनाताई महाजन यांचे औक्षण करून गिरीश भाऊ महाजन यांना विजयी करण्याचा संकल्प केला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours