*जामनेरात पवार साहेबांची आणि कराळे मास्तरांची तोफ धडाडणार.*

 

जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांना तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीचे उमेदवार माजी मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन व दिलीप खोडपे सर यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याची चर्चा तालुक्यात होतांना दिसून येत आहे. सलग ३० वर्ष झाली जामनेर मतदार संघावर गिरीश भाऊ महाजन यांची एक हाती सत्ता असून विरोधी पक्षातील प्रमूख नेते भाजप मध्ये दाखल झाल्याने जामनेर विधानसभेत ही निवडणूक एकतर्फी होईल अशा भावना तालुक्यातून व्यक्त होत होत्या मात्र भाजपच्याच तालीमेतील दिलीप खोडपे सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतल्याने जामनेर ची निवडणूक चुरशीची होतांना दिसून येत आहे. खोडपे सरांसाठी आता पर्यंत शेंदुर्णी येथे रोहीत पवार यांची तर पहूर येथे नाथाभाऊ यांच्या प्रचार सभा झाल्या असून यात दोन्ही नेत्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.तर आज दि.११ रोजी दुपारी ३ वाजता पवार साहेब यांची जाहीर सभा जळगांव रोड बोहरा सेन्ट्रल स्कूलच्या प्रांगणात होत असून आपल्या फटकार भाषणामुळे प्रचलीत असलेले नितेश कराळे मास्तर यांची जोरदार फटकेबाजीची मेजवानी जामनेरकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours